TOD Marathi

‘कौन बनेगा करोडपती’ Reality Show मध्ये 7 कोटींसाठी विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, 1 सप्टेंबर 2021 – ‘कौन बनेगा करोडपती’ या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोला अधिक पसंती मिळत असते. नुकतंच नव्या सिझनची सुरुवात झाली असून याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. अशात आता या खेळामध्ये 1 कोटी रुपयांपर्यंत पोहचलेल्या हिमेला बुंदेला यांची जोरदार चर्चा पहायला मिळतेय.

‘कौन बनेगा करोडपती’ याच्या खेळामध्ये 1 कोटी रूपयांपर्यंत पोहचून ७ कोटींच्या प्रश्नावर हिमेला बुंदेलाने खेळ सोडला. या सीझनमध्ये 1 कोटी रुपये जिंकलेल्या हिमेला बुंदे या पहिल्या स्पर्धक होत्या. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतूक होत आहे. मात्र, हिमानीला ७ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तिने एक कोटी रुपये घेऊन गेम क्वीट करण्याचा निर्णय घेतलाय.

एक कोटी रुपये जिंकून ७ कोटींच्या प्रश्नावर अडकलेल्या हिमेलाच्या प्रश्नाकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हिमेला बुंदेलाला ७ कोटींसाठी विचारलेला प्रश्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होतं? ज्यासाठी त्यांना 1923 साली डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं हिमेलाला हा खेळ सोडावा लागला.

प्रश्न ऐकल्यानंतर उत्तराबाबत हिमेला संभ्रमात दिसल्या. अचूक उत्तर माहित नसल्याने त्यांनी खेळ सोडण्याचा विचार केला. मात्र, त्यांनी 1 कोटीची रक्कम जिंकल्यानं त्यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा पहायला मिळतेय.