TOD Marathi

महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांची महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. (Maharashtra govt to publish white paper on outgoing industries from Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध प्रकल्पांवरून सुरू असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वेदांत फॉक्सकॉन, त्यानंतर टाटा एअरबस असे विविध प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. (Minister Uday Samant announcement about white paper)

ज्या पद्धतीने आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आणतो तसा मेगा खोटे बोलण्याचा प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगाबाबतची शासनाची भूमिका स्पष्ट केली. आमच्या पत्रकार परिषदेत कोणाची बाजू खोडण्याचा प्रयत्न नाही कारण महाराष्ट्रात उद्योजकांच्या बाबतीत नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे, असेही उदय सामंत म्हणाले.

सॅफ्रन प्रोजेक्ट बाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार घडला. हा प्रयत्न काय आहे की मीडियाने दीड दोन दिवसात महिन्यापूर्वी ज्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या होते त्या खोडण्याचे काम तसेच संबंधित कंपनी गेल्याचे सांगून त्याचे खापर आमच्यावर फोडण्याचे काम काही लोक करत आहेत. काही मंडळी वेगवेगळ्या बातम्या, ट्विट यांचे दाखले देत आहेत. त्यामुळे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन सीनारमस या प्रकल्पाची खरी वस्तुस्थिती महाराष्ट्र समोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिनाभरात श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis PC) यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास महाविकास आघाडी सरकार आणि महाविकास आघाडी सरकारचे धोरण कसं कारणीभूत आहे, याबद्दल माहिती दिली होती. देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray took PC with Subhash Desai after Devendra Fadnavis PC) यांनी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले होते आणि विविध आरोप राज्य सरकारवर केले होते. त्याचबरोबर राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलायला हवा मात्र ते उपमुख्यमंत्र्यांना पुढे करतात. माजी मुख्यमंत्र्यांसोबत वन-टू-वन डीबेट करायची आपली तयारी आहे असं खुलं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी दिलं होतं.

या सगळ्या घडामोडीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली आणि आता राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पांची येत्या महिनाभरात श्वेतपत्रिका निघणार असल्याची माहिती देखील दिली आहे.