TOD Marathi

माजी MLA च्या पत्नीच्या Seven Eleven Education Society ला मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ; थकविला ‘इतका’ मुद्रांक शुल्क आणि दंड

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मीरा रोड, दि. 1 ऑगस्ट 2021 – भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीला ९७ लाख ४० हजार थकीत मुद्रांक शुल्क आणि त्यावर २००८ साला पासून प्रतिमाह २ टक्के प्रमाणे दंड २१ ऑगस्ट पर्यंत भरण्याची नोटीस मुद्रांक जिल्हाधिकारी ठाणे यांनी बजावली असून दंडासह ही रक्कम काही कोटीमध्ये आहे.

मीरारोड पूर्वेला सेव्हन स्क्वेअर अकादमी ही शाळा असून हि जमीन आणि शाळा इमारत ही भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीकडून त्यांची पत्नी सुमन मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीने २००८ साली ३० वर्षाच्या नाममात्र भाडेपट्ट्याने घेतली आहे.

भाडेकरार करताना नियमानुसार नोंदणी आणि मुद्रांक शुल्क भरला नसल्याने शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करावी आणि मुद्रांक शुल्क दंडासह वसूल करावे, अशा तक्रारी २०१३ साला पासून केल्या जात होत्या.

ठाणे शहरचे प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी तानाजी गंगावणे यांनी २३ जुलै रोजीच्या तारखेची नोटीस सेव्हन इलेव्हन एज्युकेशन सोसायटीच्या सुमन मेहता यांना बजावलीय. या नोटीसमध्ये याबाबत २०१४ साली तक्रार झाली होती. १० नोव्हेंबर २०१६ रोजी सुनावणी नोटीस बजावली होती. २६ ऑक्टोबर २०२० रोजी अंतिम आदेश दिला होता.

९९२६ चौमी जमीन क्षेत्रातील एकूण ७८ हजार चौ मी ची शाळा इमारत आहे. त्याचे मुद्रांक शुल्क ९७ लाख ४० हजार १०० रुपये इतके भरले नव्हते. या मुद्रांक शुल्कसह दस्त केल्याच्या तारखे पासून प्रतिमाह २ टक्के प्रमाणे दंड अशी रक्कम नोटीस बजावल्याच्या तारखेपासून ३० दिवसात भरावी. रक्कम भरली नाही तर सक्तीच्या कारवाईचा इशारा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी नोटीसमध्ये दिलाय.