टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 ऑगस्ट 2021 – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली होती. याला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेत ‘आम्हाला कुणी थप्पड देण्याची भाषा करु नये. एकच अशी थप्पड देऊ की पुन्हा उठणार नाही’, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी इथल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप चे आमदार प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. वेळ आली, तर शिवसेना भवन फोडू, असे लाड यांनी म्हटल्याने शिवसेनेचे नेते संतापलेत. आमदार प्रसाद लाड यांच्यावर चहुबाजूने टीका होतेय. मात्र, याबाबत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे.
याअगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे, असे फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही, अशा इशारासुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ – LIVE https://t.co/mgUfm5MN2C
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 1, 2021