Indian Postal विभागाची International Yoga Day निमित्त विशेष मोहीम ; English, Hindi भाषेत असणार मोहीम

टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 जून 2021 – आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधत भारतीय डाक विभागाने विशेष रद्दबातल शिक्का जाहीर केलाय. याअंतर्गत देशातील 810 पोस्ट ऑफीसमध्ये आज 21 जून रोजी विशेष मोहोर जारी केली जाणार आहे, ज्यात ‘आंतरराष्ट्रीय योग दिनांक 2021’ असा विशेष उल्लेख असणार आहे. हिंदी व इंग्रजी अशा दोन भाषेत ही मोहीम राबविली आहे. वेगवेगळ्या ग्राफिकल डिझाईनमध्ये ही मोहोर असणार आहे, अशी माहिती भारतीय डाक विभागाने दिलीय.

सर्व डिलिव्हरी व नॉन-डिलिव्हरी हेड पोस्ट ऑफिस येथे या दिवशी कार्यालयात बुक केलेल्या सर्व टपालावर या विशेष रद्दबातल शिक्क्याचा वापर करणार आहेत.

यासह आंतरराष्ट्रीय योग दिवस चेंबूर प्रधान डाक घर येथे उत्साहाने आणि सन्मानाने साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने विशेष रद्दबातल शिक्के या कार्यालयात बुक केलेल्या व वितरित केलेल्या सर्व टपालावर चिकटवले जाणार आहेत.

Please follow and like us: