TOD Marathi

नवी दिल्ली: पंजाबच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ सुरू आहे. कॉँग्रेस पक्षात कार्यक्षमतेबद्दल शंका असल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी फोन करुन आपल्याला सॉरी म्हणाल्याचा दावा केला आहे. यात कितपत सत्य आहे या बद्दल शंका आहे. मात्र त्यांनी तसा दावा केला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, सोनिया गांधी यांनी मला सकाळी फोन केला पण मी तो उचलू शकलो नाही. त्यानंतर मी त्यांना पुन्हा फोन केला आणि हे सगळं काय चाललंय याबद्दल विचारणा केली आणि अशा परिस्थितीत मी राजीनामा देणं योग्य आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावर त्या म्हणाल्या की ठीक आहे, द्या तुम्ही राजीनामा आणि त्यानंतर त्या म्हणाल्या सॉरी अमरिंदर.

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर अनेक नावं मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत दाखल होत आहे. मात्र राहुल गांधी यांचे आप्त, माजी खासदार आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे.