IPL आज पासून पुन्हा सुरु; मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमने सामने!

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामने रविवार 19 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. या हंगामाचा दुसरा टप्पा आज संध्याकाळी सुरू होईल. आता मुंबई इंडियन्स संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. हंगाम मार्चमध्येच सुरू झाला होता पण टीममधील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे पाहून बीसीसीआयने स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर आता ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ३० वा सामना रविवार १९ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. संघातील काही खेळाडूंना कोविडची लागण झाल्यामुळे मध्येच हंगाम थांबवण्यात आला होता. मात्र आता पुन्हा या सामन्यांना सुरुवात झाली आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. आयपीएल २०२१ सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर बघता येणार आहे. तसेच डिस्नी हॉटस्टारवर देखील सामना लाईव्ह पाहता येणार आहे.

Leave Your Comment