TOD Marathi

नवी दिल्ली :महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर जून महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. यापूर्वी ही सुनावणी लांबणीवर पडत होती. सोमवारी ही सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलली होती. आज ही सुनावणी होणार की नाही, याबाबत साशंकता होती. पण सत्तासंघर्षाचं प्रकरण पटलावर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मान्यता दिली आहे

शिवसेना कुणाची? (Shivsena) आमदारांची अपात्रता, शिवसेनेच्या चिन्हाचा निर्णय यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी या सत्ता संघर्षात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray, Eknath Shinde) यांच्यासह राज्यातील आणि देशातील राजकीय पक्षांचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या वतीने हरीश साळवे यांच्यामार्फत बाजू मांडण्यात येत आहे तर उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल यांच्यामार्फत बाजू मांडण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा (CJI N. V. Ramanna) यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी होते आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या परस्परविरोधी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. याआधी १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी न्यायालयाने १० दिवस लांबणीवर टाकली होती. त्यानुसार २२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी होण्याची अपेक्षा होती. पण त्रिसदस्यीय खंडपीठामधील एक न्यायामूर्ती उपस्थित नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली होती. काल म्हणजेच सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या सप्लीमेंट्री लिस्ट (पूरक यादी) मध्ये महाराष्ट्राचे कामकाज आजसाठी समाविष्ट नसल्याने आज ही सुनावणी होणार नसल्याचं बोललं गेलं. पण शिवसेनेच्या मेन्शनिंगनंतर सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचं प्रकरण पटलावर घेण्यास मान्यता दिली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्यासमोर आतापर्यंत झालेली आहे आणि एन. व्ही. रमण्णा २६ तारखेला निवृत्त होतायेत. एन. व्ही. रमण्णा यांना आपल्या कारकीर्दीत शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? हा फैसला सुनावणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.