मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्याच उमेदवाराची वर्णी लागली असून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे.
संभाजीराजेंनी प्रस्ताव नाकारल्यास कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरु होती. यावर बोलताना संधी मिळाली तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली
पवार यावेळेस बोलताना म्हणाले की, “मला पक्षाकडून अद्याप उमेदवारीबाबत सांगण्यात आलेलं नाही. पण माझ्या नावाची चर्चा असल्याचं मी ऐकतोय. मला संधी मिळाली तर आनंदच आहे.
तसेच सध्या या चर्चेमधेच मी आनंद मानतोय. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या घराण्याचा आम्ही आदरच करतो. संभाजीराजे छत्रपती यांनी काय करावं? याबाबत मी त्यांना सूचना करणार नाही. माझ्या नावाची चर्चा ही संभाजीराजेंवर दबाव टाकण्यासाठी नाही, असंही पवार यावेळेस बोलताना म्हणाले.