TOD Marathi

वाराणसी : ज्ञानवापी प्रकरणी आज वारणीसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. याप्रकरणी आता 26 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे.

सुनावणीनंतर हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन म्हणाले की, खटला फेटाळण्यासंदर्भात मुस्लिम बाजूच्या आदेश 7 11 सीपीसी अंतर्गत याचिकांवर 26 मे रोजी सुनावणी होईल.” न्यायालयानं दोन्ही पक्षांना आयोगाच्या अहवालावर आक्षेप नोंदवून आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे