TOD Marathi

नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष पहायला मिळतो आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलं आहे. निवडणूक आयोगानं यामध्ये दोन्ही दावेदारांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. आयोगाच्या या निर्देशांविरोधात आता उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. (Shivsena in Supreme Court against Instructions of Election Commission)

शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही बाजूने केला जात आहे. दरम्यान निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांना ८ ऑगस्टपर्यंत पक्षाबाबतची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे जाईल, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असंही तज्ज्ञांचं मत आहे.