TOD Marathi

मुंबई : शिवसेना दसरा मेळाव्याचा (Shivsena Dasara Melava) वाद आता हायकोर्टात (Bombay High Court) पोहचला आहे. गणेशोत्सवापूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला असूनही अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेने (shivsena) हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दसरा मेळाव्या संदर्भात तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. आता, हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.

दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होतो. पण आता शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर मात्र नेमका शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा होणार कुणाचा? हाच मोठा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वीच शिवसेने (shivsena) महापालिकेकडे मैदानासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी मैदानासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांच्या अर्जावर महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आता, हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.