शिवसेनेचे जवळपास 40 आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये (Guwahati) आहेत. आमदारांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आहे. अशात सरकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे.
मात्र, आता ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. उदय सामंत (Minister Uday Samant) हेदेखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. सुरतहून विशेष विमानाने उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यपालांना डिस्चार्ज मिळताच सत्ताबदलाच्या हलचालींना वेग, फडणवीस करणार दिल्लीची वारी उदय सामंत यांचं फ्लाईट तिकिट समोर आलं आहे. ते सध्या सुरतहून निघाले असून लवकरच गुवाहाटीमध्ये पोहोचणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असणार आहे. उदय सामंत उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय होते.
सोबत शिवसेनेच्या बैठकांलाही ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांचं शिंदे गटात सामील होणं, शिवसेनेसाठी नक्कीच अनपेक्षित होतं. आदित्य ठाकरेंनी लावला एकनाथ शिंदेंच्या बंडाला सुरुंग, 16 आमदार संपर्कात असल्याचा दावा दरम्यान राज्यपाल हॉस्पिटलमधून राजभवनात परतताच भारतीय जनता पक्ष (BJP) सक्रीय झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (रविवार) पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. फडणवीस गेल्या काही दिवसांमध्ये चौथ्यांदा दिल्लीला जाणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.