TOD Marathi

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सरकारच्या बहुमत चाचणीसाठी शिरगणती सुरू झाल्यानंतर विजय वडेट्टीवार आणि अशोक चव्हाण विधानभवनात दाखल झाले. (Maharashtra Assembly Special Session) त्यामुळे ते मतदान करू शकले नाहीत. तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अगदी शेवटच्या क्षणी विधानभवनात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे पाच आमदार सभागृहाबाहेरच राहिले आहेत. तर अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केलं. प्रणिती शिंदे, जितेश अंतापूरकर कालही अनुपस्थित होते आता आजही अनुपस्थित आहेत. एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारने 164 मते मिळवत बहुमत प्राप्त केलेला आहे तर विरोधी पक्षाला 99 मतं मिळालेले आहेत.

सभागृहाची अंतिम बेल वाजली मात्र सेनेचे आमदार विधान परिषद सभापतींच्या दालनातच बसून होते. आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर आमदार सभागृहात जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सभागृहात मतदान करतांना काय भूमिका घ्यायची याबाबत सेनेच्या आमदारांनी चर्चा केली, अशी माहिती मिळत आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या १६ आमदारांच्या निलंबनासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. या १६ आमदारांना नोटिस देण्यात येणार आहे.

आमची पहिली परिक्षा कालच अग्निपरिक्षा होती आणि ही परिक्षा मोठ्या फरकाने पास झालेलो आहे. आजही आम्हाला मोठं बहुमत मोठ्या फरकाने विजय प्राप्त होईल असा विश्वास भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांनी अधिकृत गटनेता कोण आणि अधिकृत प्रतोत कोण याची घोषणा केलेली आहे. तसेच मुख्य प्रतोद आणि गटनेता अजय चौधरी आणि सुनिल प्रभू यांची नियुक्ती रद्द केलेली आहे. शिंदे सरकार आल्यानंतर जनता आनंदी झाली असल्याचंही दरकर यांनी यावेळी सांगितले.