TOD Marathi

हैदराबादः तेलंगणात भाजपची ताकद आधीपेक्षा दुपटीने वाढली आहे. महापालिका निवडणुकीनंतर भाजपची ताकद अधिक वाढली आहे. (BJP Telangana) म्हणूनच निवडणुकांआधी भाजपने तेलगंणासाठी रणनिती ठरवली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा केला. (PM Narendra Modi says Bhagyanagar, Not Hyderabad) पंतप्रधानांनी भाग्यनगर असा उल्लेख केल्याने देशात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे झाल्यास पुढील निवडणुका भाजपसाठी सोप्या जाणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर केला. मात्र, हैदराबादच्या नामांतराची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात हैदराबादच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांनी भाग्यनगर असा उल्लेख केला होता. रविवारी पुन्हा एकदा असाच उल्लेख त्यांनी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी इथूनच एक भारत श्रेष्ठ भारत नारा दिला, असंही मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान, आरएसएस हैदराबादला नेहमी भाग्यनगर म्हणत असते. त्यामुळं आता भाजप हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे.

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी प्रचारादरम्यान भाग्यनगर असाच उल्लेख केला होता. नोव्हेंबर २०२० मध्ये, जेव्हा योगी आदित्यनाथ महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी हैदराबादला आले होते, तेव्हा त्यांनी जाहीरपणे सांगितले होते, की भाजप सत्तेत आल्यास शहराचे नाव भाग्यनगर केले जाईल. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नागरी निवडणुकांच्या प्रचारासाठी हैदराबादला गेले होते आणि तेथे त्यांनी भाग्यनगर मंदिराला भेट देऊन दिवसाची सुरुवात केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली आहे.