TOD Marathi

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत मात्र या सर्व घडामोडी होत असताना राष्ट्रवादीच्या वतीने कुणाचीही प्रतिक्रिया आली नव्हती शरद पवार यांची प्रतिक्रिया आली नव्हती मात्र आता शरद पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आहे. (Sharad Pawar Press Conference) महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेलं बंडं, त्याचबरोबर राष्ट्रवादीची भूमिका आणि महाविकास आघाडी सरकारबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं. (Mahavikas Aghadi government)

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे;

महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी देखील असं बंडं झालं होतं.

कालच्या निकालानंतर नाराज नाही.

अडीच वर्ष सरकार योग्य चालत असल्याने हे षडयंत्र.

भाजपने यापूर्वीही असा प्रयत्न केला.

राजकीय पेचातून मार्ग निघेल असा विश्वास.

शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे की नाही हे मला माहिती नाही.

मुख्यमंत्री कोणाला बनवायचं हा शिवसेनेचा निर्णय.

क्रॉस व्होटिंग होऊनही सरकार चालतं हा पन्नास वर्षांचा अनुभव

शिवसेनेच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार.

असे प्रमुख मुद्दे शरद पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत मांडले. शिवसेनेची बैठक देखील आटोपलेली आहे. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंशी ते चर्चा करणार आहेत.