TOD Marathi

Jammu & Kashmir च्या किश्तवाडमध्ये सुरक्षादलाने दहशतवाद्यांची स्फोटके केली निकामी

टिओडी मराठी, श्रीनगर, दि. 14 ऑगस्ट 2021 – स्वातंत्र्य दिनाच्या पार्शवभूमीवर जम्मू -काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे मोठे षड्यंत्र हाणून पाडले. किश्तवाड-केशवान रस्त्यावर सापडलेली स्फोटके सुरक्षा दलांनी घटनास्थळी निकामी केली आहेत.

आज सकाळी जेव्हा सुरक्षा दलांला एका लिफाफ्यात काहीतरी संशयास्पद पडलेले दिसले, तेव्हा बस डिस्पोजल स्क्वॉडला तेथे पाचारण केले. तेव्हा कळले की ते स्फोटक आहे, हे आयईडी आहे, अशी शक्यता सुरक्षारक्षकांनी वर्तवली आहे.

ही स्पोटकं महामार्गावरील प्रवासी वाहनांना लक्ष्य करण्यासाठी लावली होती. परंतु, सुरक्षादलाने याचा शोध घेतला आणि नंतर बस इंटरसेप्शन पथकाला पाचारण करुन स्पोटकं नष्ट केली.

अशाप्रकारे मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. गुप्तचर यंत्रणेला सातत्याने माहिती मिळत आहेत की, दहशतवादी स्वातंत्र्यदिनी षड्यंत्र रचू शकतात. त्यानंतर सुरक्षा वाढवली आहे आणि शोधमोहीम सातत्याने चालवली आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीरला हाय अलर्टवर ठेवले आहे.

याअगोदर हिज्बुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याला शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातून अटक केली होती.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी दहशतवादाच्या वाटेवर असलेल्या मुझम्मिल शाहला पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईमध्ये पती मुहल्ला पाल्मरच्या कुलना वनक्षेत्रातून अटक केली आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून एक ग्रेनेड, एक मॅगझीन आणि एके-47 रायफलच्या 30 राऊंड जप्त केल्या होत्या. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवला असून याचा तपास सुरू आहे.