टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यात करोनाचा संसर्ग कमी होत असताना अचानक ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. राज्यात लस घेऊनही डेल्टा प्लसच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे? यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले कि, 66 पैकी एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांचा मृत्यू डेल्टा प्लसने झाला असे आपल्याला म्हणता येणार नाही.
कारण, त्यांना इतर व्याधीही होत्या. तसेच 62 वर्षापेक्षा त्यांचे वय होते. त्यामुळे यांचा मृत्यू केवळ डेल्टा प्लसमुळे झाला, असं म्हणता येणार ऩाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
राज्यात करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराचे आजवर एकूण 66 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात डेल्टा प्लसचे रुग्ण मिळाले आहेत. यात जळगावला 13, रत्नागिरी 12, मुंबई 11, ठाणे 6, पुणे 6, पालघर 3. रायगड 3, नांदेड 2, गोदिंया 2, आणि चंद्रपूर, अकोला, सिंधूदूर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबात, कोल्हापूर आणि बीड याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आहे. असे एकूण डेल्टा प्लसचे 66 रुग्ण राज्यामध्ये आहेत.
यात दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास 10 जणांना पुन्हा करोनाच्या डेल्टा प्लसची लागण झाली. 66 पैकी 8 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशा एकूण 18 लोकांनी लस घेतल्यानंतरी लागण झाली. यात दोघांनी कोव्हाक्सिन घेतली आहे तर 16 जणांनी कोव्हिशिल्ड घेतली, असे असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
त्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना इतरही आजार होते, हे आता समोर आलं आहे. त्यामुळे लस घेतल्याने मृत्यू होतो असं म्हणणं आता योग्य नाही, असं समजत आहे.
पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळला –
पुणे जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 5 रूग्ण असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून यापूर्वी स्पष्ट् केले आहे. त्यामुळे शहरासह जिल्हयातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एका बाजूला शहरातील निर्बंध मोठया प्रमाणात शिथील होत असतानाच डेल्टा प्लसचा रूग्ण आढळल्याने शहरासाठीची चिंता वाढाली आहे.