टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 मे 2021 – तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचं सॅलरी अकाउंट एसबीआय बँकेत असेल तर हि बातमी आपल्यासाठीच आहेत. ज्याचे सॅलरी अकाउंट एसबीआय बँकेत आहे, त्यांना एसबीआय बँकेकडून विशेष फायदे दिले जात आहेत. याची सविस्तर माहिती एसबीआयच्या वेबसाइटवर दिली आहे.
एसबीआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर तुमचं सॅलरी अकाउंट एसबीआय बँकेत आहे तर तुम्हाला वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आदींवर सवलत मिळते. याशिवाय काही अन्य फायदे हि दिले जातात.
सॅलरी खातेधारकांना एसबीआय मल्टी सिटी चेक, SMS अलर्ट, फ्री ऑनलाइन NEFT/RTGS आणि देशातील कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा SBI बँक देते. याशिवाय पाच मोठे फायदे हि एसबीआय सॅलरी खातेधारकांना देत आहे.
सॅलरी खातेधारकांना SBI बँक हे 5 मोठे फायदे :
1. लोन प्रोसेसिंग फीवर मिळते 50 टक्के सूट- SBI अकाउंट खातेधार कोणतंही लोन जसे की वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आदीच्या प्रोसेसिंग फीवर 50 टक्के सूट मिळते.
2. एअर अॅक्सिडेंटल डेथ कव्हर मिळतो – हवाई प्रवासाती दुर्घटनेतील मृत्यूप्रकरणी सॅलरी अकाउंट खातेधारकाला एअर अॅक्सिडेंटल इन्शुरन्स (डेथ) कव्हर अंतर्गत 30 लाख रुपयांचा इन्शुरन्स दिला जातो.
3. अॅक्सिडेंट डेथ कव्हर: SBI सॅलरी अकाउंट खातेधारकाला 20 लाख रुपयांपर्यंत अक्सिडेंटर कव्हर देखील मिळतो. तसेच याअंतर्गत कोणत्याही अपघातात खातेधारकाचा मृत्यू झाल्या 20 लाखांपर्यंत कव्हर दिले जाते.
4.लॉकर चार्जमध्ये दिली जाई सूट- SBI त्याच्या सॅलरी अकाउंट होल्डर्सना लॉकर चार्जमध्ये 25 टक्के सूट प्रदान करते.
5. ओव्हरड्राफ्ट सुविधा- ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा एसबीआय सॅलरी अकाउंट होल्डर्सना दिली जाते. तुम्हाला या सुविधेअंतर्गत दोन मगिन्याच्या सॅलरी एवढी रक्कम मिळू शकते.