TOD Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (NCP leader Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde comments over statememt of Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत, कोणाला वाटेल ते करणार नाही’ जे लोकांना वाटते तेच आम्ही करणार, अशी खरमरीत प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी देखील काल भुजबळांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटो संदर्भात एक वक्तव्य केलं होतं, त्यानंतर राज्यातील विविध नेत्यांनी छगन भुजबळांवर टीका देखील केली होती. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Fule, Jyotiba Fule) यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटो संदर्भात वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत, कोणाला काय वाटेल ते करणार नाही, अशा स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

काय होतं वक्तव्य?

शाळांमध्ये फुले-शाहू-आंबेडकर-कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत, कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु सरस्वतीच्या फोटो शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही, त्यांची पूजा कशासाठी करायची असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. महापुरुषांमुळे तुम्हाला आम्हाला शिक्षण मिळालं, सगळं मिळालं त्यांची पूजा करायला हवी त्यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असंही वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं.