मुंबई : गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबईतून (Mumbai) निघून गेले तर मुंबईत पैसा उरणार नाही, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं होतं. त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं या विधानावरून राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. तर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांवर टीका करतानाच शिंदे गट आणि भाजपचीही कान उघाडणी केली आहे.
राऊत म्हणाले, राज्यपालांकडून महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात आहे. मुंबई मराठी माणसांची आणि कष्टकऱ्यांची आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचवेळी त्यांनी शिंदे गटानं राज्यपालांचा साधा निषेध तरी करावा, असं आव्हान केलंय. मराठी, कष्टकरी जनतेवरील अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. राज्यपालांना मी नाना शंकरशेठ यांचं चरित्र पाठवणार असून त्यांनी ते वाचावं, असंही त्यांनी म्हटलंय.
राज्यपाल महोदयांच्या बेताल विधानाचा समाचार घेण्यासाठी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद:
आज. मातोश्री.१ वाजता. pic.twitter.com/kEDEg0reO4— Sanjay Raut (@rautsanjay61) July 30, 2022
आपण संसदेत हा मुद्दा मांडणार असून, भगतसिंग कोश्यारी यांना परत बोलावून घेण्याची मागणी केंद्राकडे करणार असल्याचंही सुळे यांनी सांगितलं. (Supriya sule on governor Bhagatsingh Koshyari Statement)
राज्यात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला आहे. थोडा जरी स्वाभिमान आणि अभिमान असेल तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्या. अथवा शिवसेनेचं नाव घेऊ नका, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. त्यामुळं आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.