TOD Marathi

अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

संबंधित बातम्या

No Post Found

Akola Municipal Corporation
अकोला :
ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अकोला महापालिका निवडणुकीत ओबीसींच्या जागांसाठी आज आरक्षण सोडत पार पडली. यापूर्वी महिलांसाठी (खुला प्रवर्ग) आरक्षित केलेल्या 37 जागा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे तर ओबीसींसाठी 24 जागा आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी 12 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
अकोला महापालिकेच्या एकूण 91 जागांपैकी अनुसुचित जातींसाठी 15, अनुसुचित जमातीसाठी 2 आणि महिलांसाठी 37 जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण मंजुर केल्याने पुन्हा नव्याने आरक्षणाची सोडत घेतली गेली. यावर 30 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार करुन 5 ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.
अकोला महापालिकेचं आरक्षण :
एकूण प्रभाग 30
एकूण जागा : 91
 महिलांसाठी राखीव : 46 जागा
 अनुसुचित जाती : 15 जागा (पैकी 8 महिला)
 अनुसुचित जमाती : 2 जागा (पैकी 1 महिला)
 सर्वसाधारण : 50 जागा (महिलांसाठी 25 जागा)
 ओबीसी : 24 जागा (महिलांसाठी 12 जागा)

अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव जागा
अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार एकूण 15 प्रभागातील 15 जागा अनुसुचित जातींच्या उमेदवारांकरीता राखीव आहे. यातील 8 जागा या अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. ज्यात 3,6, 9, 10, 12, 18, 19, 23 ‘अ’ या जागांचा या राखीव जागांमध्ये समावेश आहे.

अनुसुचित जमाती महिलासाठी राखीव जागा
अकोला महापालिकेत अनुसुचित जमाती(एसटी)साठी दोन जागा राखीव आहेत. यातील ’24-अ’ ही जागा अनुसुचितसाठी महिलेसाठी राखीव असणार आहे.
सर्वसाधारण गटासाठी राखीव असलेल्या जागा खालीलप्रमाणे :
सर्वसाधारण राखीव प्रभाग आणि गट :
1, 3, 5,7,8, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 21, 22, 26, 27, 29 ब, 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 क, 30 ड.
महिला राखीव :
1, 3, 5, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 21, 22, 26, 27, 28, 29 ब, 4, 6, 9, 19, 25, 30 क.

महापालिकेत सध्या पक्षीय बलाबल
एकूण जागा : 80
 भाजप (BJP) : 48
 काँग्रेस (Congress) : 13
 शिवसेना (Shivsena) : 08
 राष्ट्रवादी (NCP) : 05
 वंचित बहुजन आघाडी : 03
 एमआयएम (AIMIM) : 01
 अपक्ष : 02