Sanjay Raut Custody : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam Case) अटकेत असलेले शिवसेना नेते (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांना 8 दिवसांच्या ईडी (ED) कोठडीनंतर 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) हजर करण्यात आलं होतं. सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं संजय राऊत यांना पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुन्हा 5 सप्टेंबरपर्यंत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात येणार आहे.
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती.
आज पुन्हा त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ईडीनं समन्स बजावलं होतं. त्यांचीही चौकशी करण्यात आली.