TOD Marathi

मुंबई : सिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशीची झाली पाहिजे, जुनी फाईल पुन्हा ओपन करावी, अशी मागणी अलीकडेच भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली होती. आणि अप्रत्यक्ष अजित पवार यांना टार्गेट केलं होतं. त्यानंतर जवळपास चार दिवस राज्याचं राजकारण धुमसत राहिलं. ती चर्चा आता कुठे थांबली होती की मोहित कंबोज यांनी आता पुन्हा एक नवं ट्विट केलं आहे. (Mohit Kamboj New Tweet) अजित पवारांच्या नंतर आता कंबोज यांच्या रडारवर रोहित पवार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.

अधिवेशनाच्या एक दिवस पूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करुन राज्याच्या राजकारणाची पुढच्या काही दिवसांसाठी दिशाच बदलून टाकली. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत तुरुंगात असताना राष्ट्रवादीचा बडा नेता त्यांच्यासोबतच लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा केला होता. त्यानंतर मोहित कंबोज यांना रोहित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलं होतं. ओव्हरसिज बॅंकेचा ५२ कोटी रुपयांचा घोटाळा आणि त्याचसोबत पीएनबी बॅंकेचा घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या मोहित कंबोज यांचं नाव आलं आहे, तुम्ही त्याच कंबोजांबद्दल मला प्रश्न विचारलाय ना…” असं म्हणत रोहित पवारांनी (Rohit Pawar on Mohit Kamboj) कंबोज यांच्यावर निशाणा साधला होता. रोहित पवार यांची प्रतिक्रिया कंबोज यांच्या जिव्हारी लागली नसेल तर नवलच.

“बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीसंदर्भात मी सध्या अभ्यास करत आहे. (Baramati agro ltd. Company) त्यासंदर्भातली संपूर्ण माहिती मी लवकरच बाहेर घेऊन येईन”, असा इशाराच मोहित कंबोज यांनी दिला आहे. रोहित पवार यांच्या ॲग्रीकल्चर आणि साखर कारखान्यांबाबतचा अभ्यास सुरू केल्याचे कंबोज यांनी ट्विटमधून म्हटलंय. “बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीच्या यशाचं रहस्य काय, ज्याचा अभ्या करुन मी तरुणांसमोर मांडेन, ज्याचा त्यांना भरपूर फायदा होईल”, असं उपहासात्मक ट्विट करुन कंबोज यांनी रोहित पवार यांना टार्गेट केलं आहे.