Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
ते पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय? संजय राऊत यांना ईडीनं पत्राचाळ प्रकरणी अटक केलीय

TOD Marathi

शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut ED Arrest) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलंय. काल दिवसभराच्या चौकशीनंतर राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानं आता राजकारण चांगलंच तापलंय. राऊत यांना ईडीने याआधी अनेक वेळा समन्स पाठवले होते. मात्र त्या समन्सला त्यांनी उत्तर न दिल्यामुळे, चौकशीला सहकार्य न केल्यामुळे ईडीची टीम त्यांच्या घरी पोहचली. या धाडीत त्यांना ईडीकडून पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यांच्या घराची झडतीही घेण्यात आली. पण ज्या प्रकरणामुळे राऊत गोत्यात सापडलेत ते पत्राचाळ प्रकरण नेमकं आहे तरी काय? आणि या सगळ्याशी राऊतांचा नक्की संबंध कसा, हेच आपण आज थोडक्यात समजून घेणार आहोत.

मुंबईत गोरेगावमधील पत्राचाळीत (Patrachawl Matter) महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. येथील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या ६७२ कुटुंबीयांचं पुनर्विकास करायचा कॉन्ट्रॅक्ट प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता. प्रवीण राऊत हे बांधकाम व्यावसायिक असून ते गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक आहेत. सद्या ते ईडीच्या अटकेत आहेत.
त्यांच्या कंपनीला एकूण ३ हजार फ्लॅटचं काम देण्यात आलेलं. त्यातले ६७२ फ्लॅट्स भाडेकरूंसाठी राखीव ठेवण्यात आले होते आणि बाकीचे म्हाडा आणि बिल्डर लोकांमध्ये वाटून देण्यात येणार होते. मात्र ईडीच्या आरोप पत्रात केलेल्या आरोपांनुसार, २०११ ते २०१३ या दरम्यान प्रवीण राऊत यांच्या कंपनीने या चाळीतले काही भाग खासगी बिल्डरला विकले आणि चाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली. आणि त्यांनी तब्बल 1074 कोटी रुपये जमवले. मात्र यात पत्राचाळेचा एक इंचही पुनर्विकास केला नाही. पण या जीवावर त्यांनी बँकेतून 95 कोटी रुपयांचं कर्जही मिळवलं होतं.

हा सगळा पैसा त्यांनी त्यांचे मित्र, कुटुंबीय आणि विविध खात्यात वळती केला. यातील 55 लाख रुपये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा केले. याच रकमेतून संजय राऊतांनी दादर इथे फ्लॅट घेतला. असा इडिला संशय आहे. यावरून वर्षा राऊत यांनीही ईडीनं नोटीस बजावली होती. त्यावेळी वर्षा यांनी 55 लाख माधुरी यांना परत केले होते. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Pravin Raut and Sujit Patkar) यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीनं एकूण ७ ठिकाणांवर छापेमारी केली होती. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीनं अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचंही यात उघडकीस आलं.

या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. तसंच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आल्याचा आरोपही यावेळेस करण्यात आला. अशाप्रकारे आर्थिक गैरव्यवहार, पत्राचाळ प्रकरण या सगळ्यात काहीतरी गोडबंगाल आहे. असा ईडीला संशय आला आणि राऊत यात चांगलेच अडकले. त्यात केंद्र सरकारवर टीका केली की इडी कारवाई करते. असं वारंवार बोललं जातंय. अशावेळेस शिवसेनेचे फायरब्रँड राऊत कसलीही भीती न बाळगता भाजपला अंगावर घेत होते. हा झाला भूतकाळ. पण सध्या राऊतांना ईडीनं अटक केलीय. आणि त्यांच्यासाठी यापुढचा काळ जास्त कठीण असणार आहे एवढं मात्र नक्की….

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज