TOD Marathi

यंदाची राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha election)अत्यंत चर्चेचा विषय ठरली आहे. राजकारणातला ड्रामा या दरम्यान पाहायला मिळाला. राज्यसभेच्या निकालावरून छत्रपती संभाजीराजेंच्या समर्थकांनी  एक पोस्टरबाजी करत सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टर द्वारे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सरळ  निशाण साधण्यात आलाय. ‘गनिमी कावा वापरुन छत्रपतींच्या अपमानाचा बदल घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार’, असा मजकूर पोस्टरवर झळकत आहे.

नेमकं काय आहे हे पोस्टर ?

मुंबईत शिवसेना भवनासमोर हे पोस्टर लावले असून या पोस्टरवर एका  बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) फोटो दिसतआहे तर, त्याच्या खालच्या बाजूला छत्रपती संभाजीराजेंचा (Sambhaji Raje) फोटो आहे. शिवाय तिथे माजकुरही आहे तो म्हणजे, आज पुनः एकदा सिद्ध झालंय महाराष्ट्र आमच्या बापचा आहे. छत्रपती शिवरायांचा… ! गनिमी कावा वापरुन  छत्रपतींच्या अपमानाचा बदल घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे जाहीर आभार , राज्यसभा तो झांकी है स्वराज्य में 2024 अभि बाकी है जय शिवराय “असा मजकूर या पोस्टर वर छापलेला दिसून येतो.

या पोस्टरबाजीवरून  छत्रपती संभाजीराजेंनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया  दिली आहे.