TOD Marathi

रशियाच्या Sputnik V लसचे उत्पादन Serum मध्ये करणार ; हडपसरमध्ये वर्षाला 30 कोटी Doses चे उत्पादन होणार

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 जुलै 2021 – रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये होणार आहे.
या सप्टेंबरपासून याचे उत्पादन सुरू केले जाईल. रशियन थेट परकीय गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) आणि सीरमने याची घोषणा केली.

भारताच्या औषध नियामकांनी ४ जुलै रोजी चाचणीसाठी लसीची लहान तुकडीच्या उत्पादनास परवानगी दिली होती. सीरमच्या हडपसर येथील केंद्रामध्ये हे उत्पादन घेतले जाणार आहे. त्याचा विनियोग मुख्यत: चाचणीसाठी केला जाईल.

स्पुटनिकचे सीरममधून पहिले उत्पादन सप्टेंबर महिन्यामध्ये बाहेर पडणार आहे, अशी अपेक्षा आहे. भारतामध्ये या लसीचे दरवर्षी 30 कोटी (डोस) मात्रांची निर्मिती केली जाणार आहे.

तांत्रिक हस्तांतर प्रक्रियेचा भाग म्हणून सीरम इन्स्टिट्यूटला याअगोदर लसीचे ‘सेल आणि व्हेक्‍टर सॅंपल’ मिळालेत. त्याला भारतीय औषध नियामकांनी आयातीची परवानगी दिल्यानंतर त्याची ‘कल्टीव्हेशन’ प्रक्रिया सुरू केली आहे. सीरममध्ये सध्या ऑक्‍सफर्ड – ऍस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीचे उत्पादन केले जाणार आहे.

नोव्हाव्हॅक्‍सने करोनावर शोधलेल्या लसचे स्थानिक बाजारपेठेमध्ये कोव्होव्हॅक्‍स नावाने उत्पादन सुरू आहे. याशिवाय कोडॅजेनिक्‍स या लसीच्या इंग्लंडमध्ये मानवावरील चाचण्या सुरू आहेत. आता भारत हे स्पुटनिक लसच्या उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

विविध संस्थांशी करार करून भारतात 85 कोटी डोसचे वर्षभरात उत्पादन करणार आहे. ग्लॅंड फार्मा, हेतेरो बायोफार्मा, पॅनॅसिया आयोटेक, स्टेलीस बायोफार्मा, विचोर बायोफार्मा आणि अन्य काही कंपन्यांनी या रशियन लसच्या उत्पादनाचे करार केलेत.