साऊथहम्पटन : इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने 50 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयात हार्दिक पांड्याने फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजीतही कमाल करत मोठा वाटा उचलला. त्याने 51 धावांची खेळी करत 4 विकेटही घेतल्या. याचबरोबर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील कॅप्टन्सीचे (Captain) एक वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड (Rohit Sharma sets new world record) आपल्या नावावर केलाय. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सलग 13 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.
रोहित शर्माने अफगाणिस्तानच्या असगर अफगाणचे सलग 12 सामने जिंकण्याचा विक्रम मोडत काढला. आता सलग टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत 13 विजय मिळवणारा रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ अफगाणिस्तानच्या असगर अफगाण याचा दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर सलग 11 विजय मिळवणाऱ्या रोमानियाचा रमेश सतीनस हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.