TOD Marathi

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार नेहमीच आपल्या मतदारसंघासह वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठींसह दौरे करत असतात. मतदारसंघातील नागरिकांना शक्य ती मदत करतानाही ते दिसतात. याच संबंधी त्यांनी केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली असून आता सर्वत्र त्या पोस्टची चर्चा होत असतानाच लोकप्रतिनिधी म्हणून रोहित पवारांचं कौतुक देखील होत आहे.एका अपघातात जखमी होऊन मेंदूला मार लागलेल्या उसतोड मजूराच्या चिमुकल्याचा जीव वाचवला आहे.

“सांगलीमध्ये ऊसतोडीला गेले असताना दुचाकी अपघातात माझ्या मतदारसंघातील प्रविण फुंदे या चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर व मेंदूला जबर मार लागला होता. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करण्याकामी लक्ष घातल्याने त्याचे वडील हरिदास फुंदे यांनी आग्रह करून मला घरी बोलावलं.”

 

घरी गेल्यानंतर अनपेक्षितपणे माझ्यावर फुलांचा वर्षाव केला. वैद्यकीय उपचारांसाठी गरजूंना नेहमीच मदत करत असतो पण काल अचानक झालेल्या या अनोख्या स्वागताने भारावून गेलो आणि लोकांसाठी अधिक जोमाने काम करण्यास बळ मिळालं. विशेष म्हणजे प्रविण आता बरा झाला असून त्याला भेटून खूप आनंद वाटला.”

अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी करत या घटनेची माहिती दिली आहे. ही गोष्ट समाज माध्यमांमध्ये माहिती होत असताना रोहित पवार यांच्या या कृतीचे सर्वत्र भरभरून कौतुक केले जात आहे. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.