TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 27 जुलै 2021 – मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात तर महापूराची परिस्थिती निर्माण झालीय. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता या पुराचे पाणी ओसरत आहे. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. लेप्टो, डेंग्यूसह इतर साथीचे रोग पसरु नयेत, यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यामध्ये मेडीकल कॅम्प भरविणार आहे, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

सध्या पाऊस कमी झाल्यामुळे पुराचे पाणी ओसरत आहे. पण, त्यामुळे चिखल आणि घाणीचे साम्राज्य प्रत्येक गावात पाहायला मिळतेय. यामुळे रोगराई वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता मेडिकल कॅम्प उभारणार आहे.

याबाबत अमित देशमुख म्हणाले, हि परिस्थिती भीषण आहे. आता महापुरानंतर लेप्टो, डेंग्यू आणि इतर साथीचे रोग पसरू नये, यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यामध्ये मेडीकल कॅम्प उभारणार आहे.

तिथल्या तिथे मेडीकल सुविधा पोहोचविण्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना करणार आहे. राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन जनतेची मदत करण्याची हीच वेळ आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील पूरस्थिग्रस्त नागरिकांना लागणारी सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे, असे सांगितले आहे.

तसेच, आरोग्य विभागाच्या दृष्टीने पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावामध्ये एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करुन ठेवला आहे. त्यासोबत आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधे पाठवली आहे, असे त्यांनी सांगितले.