टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 जुलै 2021 – राज्यावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. पण, राज्यातील अनेक ठिकाणी आजही निर्बंध कायम आहेत. या दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील लोकल कधी सुरू होणार?, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार?, अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे, असे राजेश टोपे म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर म्हणाले, तिसरी लाट येऊ शकते पण, ती कधी येईल? हे आपल्यावर आहे. आपण जर कोरोनाचे नियम व्यवस्थित पाळले, तर आपल्याला कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल. तसेच लसीकरण सुद्धा रामबाण उपाय आहे. म्हणाले.
पहिला रुग्ण आढळल्यापासून ICMR ने काही नियम आखून दिलेत. त्या नियमानुसार महाराष्ट्र काम करत आहे. ICMR सेरो सर्व्हे केलाय. त्यानुसार त्यांनी आम्हाला प्रोटोकॉल द्यावा.
कशाप्रकारे निर्बंधामध्ये सुट देता येईल? या संदर्भात सूचना द्याव्या. कारण आताच केंद्राचे पथक येऊन गेले त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सुचना दिल्यात. आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमची वर्तवणुक असते. ICMR ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येतील.