टिओडी मराठी, पुणे, दि. 13 जुलै 2021 – राज्यांतील कारागृहामध्ये आता रेस्टॉरंटच्या धर्तीवर खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. हे खाद्यपदार्थ बंद्यांना कॅण्टीनमधून खरेदी करता येतील. पुर्वी मिळत असलेल्या खाद्यपदार्थांच्या संख्येत वाढ करत काही चविष्ठ आणि मागणी असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश केला आहे. एवढच नव्हे, तर कैद्यांना हेअर प्रोडक्टही उपलब्ध करुन देणार आहेत.
अतिरिक्त महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी दिलेली माहिती अशी, अंडी, दूध, बेकरी उत्पादने कारागृहांतील कॅण्टीनमध्ये उपलब्ध होती. या खाद्यपदार्थांत वाढ केली असून रेडी टु इट प्रोडक्टचाही समावेश केला आहे.
तसेच मासे, चिकण, मिठाई, सोन पापडी, ड्रायफ्रुट, कचोरी, समोसा, पनीर, विविध प्रकारचे ज्यूस, अंडा करी, मिनरल वॉटर, फळे, शुध्द तूप आदी पदार्थांचा नव्याने समावेश केला आहे. तर करोना काळात कैद्यांना प्रोटीन आणी व्हिटामिन असलेला डाएट दिला जात आहे.
बंद्याचे बॅंक खाते कारागृहाशी संलग्न असते. यात त्यांच्या घरच्यांना पैसे देखील भरता येतात. एक बंदी महिन्याला स्वत:वर साडेचार हजार रुपयांपर्यंत खर्च करु शकतो. या पैशातून तो कारागृहातील कॅण्टीनमधून खाद्य पदार्थ आणि इतर उत्पादने विकत घेऊ शकतो.
तर, दुसरीकडे कारागृहात कुशल आणि अकुशल कामगारांना दैनंदिन 49 ते 70 रुपये पगार दिला जातो. या जमा झालेल्या पैशातूनही ते खरेदी करू शकतात.