टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 जुलै 2021 – सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्कसह त्याच्या निर्देशांच्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अॅक्सिस बँकेला 5 कोटींचा दंड ठोठावलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी ही माहिती दिली आहे. आरबीआय नियमांचे पालन न केल्याने अनेकदा बँकांना दंड आकारत असते. काही दिवसांपूर्वी आरबीआयने बंधन बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यासह 14 बँकांना विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आर्थिक दंड आकारला होता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या निर्देशांच्या काही तरतुदींचे ‘उल्लंघन / अनुपालन’ करण्यासाठी हा दंड आकारला आहे. यात ‘प्रायोजक बँक आणि एससीबी /युसीबी यांच्यामध्ये कॉर्पोरेट ग्राहक म्हणून पेमेंट यंत्रणेचे नियंत्रण मजबूत करणे, बँकांमध्ये सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क’ आणि ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (बँकांद्वारे पुरविल्या जाणार्या वित्तीय सेवा) निर्देश, 2016 समाविष्ट आहेत. यात ‘वित्तीय समावेशन बँकिंग सेवा सुविधा प्राथमिक बचत बँक ठेवी खाते आणि ‘फसवणूक वर्गीकरण आणि रिपोर्टिंग करणे’ हि समाविष्ट आहे.
हे दंड आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांच्या काही तरतुदींचे ‘उल्लंघन / अनुपालन’ केल्याबद्दल लागू केलं आहे. त्याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
आरबीआयने स्पष्टीकरण दिले की, नियामक अनुपालन नसल्यामुळे हा दंड बँकांवर लादला आहे. ग्राहकांच्या कोणत्याही व्यवहाराशी त्याचा काही संबंध नाही.
रिझर्व्ह बँकेने असे म्हटले आहे की, 31 मार्च 2017, (ISE 2017), 31 मार्च, 2018, (ISE 2018) आणि 31 मार्च 2019 (ISE 2019) पर्यंत बँकेच्या पर्यवेक्षी मूल्यांकनासाठी वैधानिक तपासणी आर्थिक स्थितीवर आधारित केलं आहे.
ISE 2017, ISE 2018 आणि ISE 2019 शी संबंधित जोखीम मूल्यांकन रिपोर्टची छाननी केल्यामुळे सूचनांचे उल्लंघन झाल्याचे कळाले आहे.