TOD Marathi

नवी दिल्ली: पंजाबमध्ये सध्या राजकारणात त्यातल्या त्यात कॉंग्रेस पक्षात अंतर्गत राजकारण चांगलेच रंगत आहे. त्यातच मुख्यमंत्री पदासाठी नवनियुक्त चरणजीतसिंग चन्नी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी चरणजीतसिंग चन्नी यांनी तीनही शेती कायदे रद्द करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री पदासाठी आपली जागा पक्की करण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीच्या वेशीवर गेल्या दहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत असून केंद्राने आता त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. शेती हे उत्पन्नाचे एकमेव साधन असून केंद्र सरकारने वादग्रस्त शेती कायदे मागे घ्यावेत, अशी विनंती पंतप्रधानांकडे केल्याची माहिती चन्नी यांनी भेटीनंतर पत्रकारांना दिली.

नवनियुक्त मुख्यमंत्री दिल्लीत येऊन पंतप्रधानांची भेट घेत असतात, या प्रथेनुसार चन्नी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली असली तरी, मुख्यमंत्रिपदावरील स्थान पक्के करण्यासाठी त्यांनी तातडीने पंतप्रधानांची गाठभेट घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे.