टिओडी मराठी, दि. 24 ऑगस्ट 2021 – शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर अर्थात एफ आर पी वाढविण्याच्या प्रस्तावाला आज मंजुरी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ आणि सीसीई च्या बैठकीमध्ये उसाची एफआरपी सुमारे पाच रुपये प्रति क्विंटल वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या भारतीय वाढल्याने साखरेचा आहे एम एस पी आणि इथूनच ची किंमत वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याचा साखर कारखान्यांना फायदा होणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली या बैठकीमध्ये दहा टक्के वसुली च्या आधारावर ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर अर्थात एफआरपी 290 रुपये प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज दिली. एफ आर पी प्रतिक्विंटल पाच रुपयांनी वाढवला आहे. मागील वर्षी या पार्टीमध्ये दहा रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली होती त्यामुळे आता उसाची पार्टी 290 रुपये प्रति क्विंटल झाली आहे.
यावेळी पियुष गोयल म्हणाले, साखरेची एफ आर पी 290 प्रतिक्विंटल आहे, जी दहा टक्के वसुली वर आधारित असणार आहे. 70 लाख टन साखरेची निर्यात होणार आहे, त्यापैकी 55 लाख टन झाली आहे. सध्या 7.5% ते आठ टक्के इथेनॉलचे मिश्रण केले जात आहे.
पुढील काही वर्षात हे मिश्रण 20 टक्के पर्यंत जाणार आहे. आजच्या निर्णयानंतर भारत हा एकमेव देश असेल जिथे ऊस उत्पादकांना साखरेच्या किमतीनुसार सुमारे 90 ते 91 टक्के ऊस मिळणार आहे. जगातील देशांमध्ये ऊस उत्पादकांना साखरेच्या किमतीच्या 70 ते 75 टक्के ऊस मिळतो सरकारच्या धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे.
उसाची एफआरपी किंमत 290 रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकऱ्यांना खर्चाचा 87 टक्के परतावा मिळणार आहे. इथेनॉल उत्पादक, साखर निर्यातीला प्रोत्साहन, साखर उद्योगाला बफर स्टॉक द्वारे पैसे देणे, अशा निर्णयांनी ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे मिळवून देणे असा त्यांना फायदा होणार आहे. 2020 ते 21 मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 91 हजार कोटी द्यायचे होते. त्यापैकी 86 कोटी रुपये दिले गेले आहेत. केंद्र सरकारने आणि ग्राहकांचे हित जोपासले आहे.