आमचे तीनही उमेदवार निवडून येतील, निर्णय ‘त्यांनी’ घ्यायचाय… देवेंद्र फडणवीस

मुंबई :
राज्यसभेच्या (Rajyasabha Electon 2022 ) सहा जागांसाठी निवडणूक होतेय. यामध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे तीन रिटायर झाले, तीन येणार, निर्णय त्यांना घ्यायचाय!”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

भाजपच्या वतीने राज्यसभेसाठी विद्यमान केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राज्याचे माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपच्या वतीने तिसरा उमेदवार दिल्याने आता राजकीय समीकरण बदलणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी दिलेल्या 7 उमेदवारांपैकी कोणता 1 उमेदवार उमेदवारी मागे घेतो का किंवा निवडणुकीला सामोरे जातात हे बघावं लागणार आहे. आम्ही तिसरा उमेदवार दिलाय तर सर्व विचार करून दिलाय असंही फडणवीस म्हणाले.

Please follow and like us: