टिओडी मराठी, वॉशिंग्टन, दि. 18 जुलै 2021 – महासागराच्या अंतरंगाचा शोध घेणाऱ्या सागरी संशोधकांना प्रशांत महासागरात एका दुर्लभ अशा ऑक्टोपसचा शोध लागलाय. या ऑक्टोप्सचे संपूर्ण शरीर पारदर्शक आहे. त्यामुळे या ऑक्टोपसला ग्लास ऑक्टोप्स असे नाव दिले आहे. या ऑक्टोपसचे शरीर इतके पारदर्शक आहे की, त्याच्या शरीरातील सर्व अवयवांचे दर्शन बाहेरून पाहायला मिळते.
प्रशांत महासागरातील फिनिक्स आयलँडच्या नजीक हा दुर्लभ असा ऑकटोपास सापडला आहे. वैज्ञानिक भाषेमध्ये या ऑक्टोपसला व्हिटर्ले दोनाल्डो रिकार्डी असे म्हंटलं जातं.
या प्रकारचे ऑक्टोपस समुद्रात खूप खोलवर आढळत असतात. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचणे खूपच अवघड असते. संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंत ग्लास ऑक्टोपसवर कोणत्याही प्रकारचे संशोधन झालेले नाही.
या ग्लास ऑकटोपसाचे शरीर 45 सेंटिमीटरपर्यंत लांब असते. त्याचे डोळे चौकोनी असतात. सागरविषयक संशोधन करणाऱ्या शेमीडीत. ओशन इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर डॉक्टर ज्योतिका विरमानी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आगामी कालावधीत या ऑक्टोपसवर आणखी संशोधन करण्याची आवश्यकता आहे.