भारतातील ‘या’ शहरांतून दिसणार दुर्मिळ ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण; हे वर्षातील दुसरे ग्रहण

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 जून 2021 – भारतातील काही शहरांतून दुर्मिळ ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण दिसणार आहे. हे पहिले सूर्यग्रहण उद्या म्हणजेच 10 जून रोजी होणार आहे. तर, हे वर्षातील दुसरे ग्रहण असणार आहे. याअगोदर पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी झाले होते. सूर्यास्ताच्या अगोदर हे सूर्यग्रहण केवळ अरुणाचल प्रदेश व लडाखमध्ये दिसणार आहे.

भारताच्या इतर भागातून हे सूर्यग्रहण दिसणार नाही. जरी हे पूर्ण सूर्यग्रहण असेल तरी भारतात ते अर्धवट स्वरूपामध्ये दिसणार आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी १.४२ वाजता हे ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण सुरू होणार असून संध्याकाळी ६.४१ वाजता संपणार आहे. हे सूर्यग्रहण अरुणाचल प्रदेशातील दिबंग वन्यजीव अभयारण्याजवळून संध्याकाळी ५:५२ वाजता पाहता येणाराय.

तर लडाखच्या उत्तरेकडील भागात ते संध्याकाळी ६ च्या सुमारास दिसणार आहे. उत्तर अमेरिका, उत्तर कॅनडा, युरोप आणि आशिया, ग्रीनलँड, रशियाच्या बऱ्याचशा भागांत हे सूर्यग्रहण दिसणार आहे. कॅनडा, ग्रीनलँड व रशियात अंगठीच्या आकाराप्रमाणे दिसणार आहे.

तर उत्तर अमेरिका, युरोप आणि उत्तर आशियाच्या बऱ्याच भागांमध्ये हे केवळ अर्धवट स्वरुपात दिसणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार हे सूर्यग्रहण १४८ वर्षांनी जेष्ठ अमावस्येला हे ग्रहण दिसणार आहे. गुरुवारी १० जून रोजी हे ग्रहण लागणार आहे.

Please follow and like us: