बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट प्रकरण अद्यापही संपलेले नाही. रणवीरच्या या कृतीला झालेला विरोध, ठिकठिकाणी पोलिसात झालेल्या तक्रारी यामुळे हे प्रकरण तापले होते. मध्यंतरी हे प्रकरण शांत झाले. मात्र आता थेट पोलिसांनी रणवीरच्या घरीच भेट दिली आहे. त्यामुळे रणवीरच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. (Ranveer Singh served notice by Mumbai Police over nude photoshoot controversy)
काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंग याने न्यूड फोटो शूट करून ते सोशल मिडियावर शेयर केले होते. एक मॅगजझिनसाठी त्याने हे फोटोशूट केले होते. परंतु त्यांच्या कृत्याला काही संघटनांनी विरोध केला. सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले गेले. अनेक शहरांमध्ये त्याच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या. त्याच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. काहींनी मोर्चे काढले तर काहींनी त्याचा निषेधही केला. आता हे प्रकरण थेट त्याच्या दाराशी आलेलं आहे.
कारण या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी लक्ष घातले आहे. राज्यभरात रणवीर विरोधात गुन्हे दाखल झाल्याने मुंबई पोलिसांनी रणवीरला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटिस बजावली आहे. २२ ऑगस्ट पर्यंत रणवीरने पोलिस ठाण्यात चौकशीसाठी यावे असे या नोटीशीत म्हंटले आहे. ही नोटिस घेऊन मुंबई पोलिस स्वतः रणवीरच्या घरी गेले होती. परंतु रणवीर तेव्हा घरी नव्हता. किंबहुना रणवीर सहकुटुंब बाहेर गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिस काही दिवसांनी पुन्हा त्याच्या घरी भेट देणार असल्याचेही समजते. परंतु रणवीरला आता चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहावे लागेल हे नक्की.