Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी सप्टेंबरमध्ये मतदान

TOD Marathi

मुंबई:

राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान होणार असून त्या संबंधीचे परिपत्रक आज निवडणूक आयोगाच्या वतीने जारी करण्यात आलं आहे. यामध्ये थेट सरपंचपदाचाही समावेश असून 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी हा नियम लागू असणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहितादेखील लागू झाली आहे. 18 सप्टेंबरला मतदान आणि 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली. (Grampanchayat elections in Maharashtra state)

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तिथल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. या निवडणुकीसाठी 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत अर्ज दाखल करता येतील. दरम्यान शासकीय सुट्टीमुळे 27, 28 आणि 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

असा असणार निवडणूक कार्यक्रम (Election Program)

18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध.
24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान अर्ज दाखल करण्याचा कालावधी.
2 सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी.
6 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची वेळ
18 सप्टेंबर रोजी मतदान
19 सप्टेंबर रोजी निकाल

जिल्हानिहाय व तालुकानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या

नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75.
धुळे: शिरपूर- 33.
जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02.
बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02.
अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01.
वाशीम: कारंजा- 04.
अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01.
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08.
नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01.
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04.
नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17.
पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02.
अहमदनगर: अकोले- 45.
लातूर: अहमदपूर- 01.
सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08.
कोल्हापूर: कागल- 01.

एकूण: 608

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज