पुणे : मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील सुपरस्टार रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास त्यांनी घेतला.त्यांच्या पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून मुलगा अजिंक्य देव अभिनेता तर दुसरा मुलगा अभिनव हा दिग्दर्शक आहे.
रमेश देव हे मूळ राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील होते. त्यांचे वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब कोल्हापुरात आले. रमेश देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले.
एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना मदत केली होती. त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले आणि नंतर राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे आडनाव ‘देव’ झाले. आनंद सारख्या प्रसिद्ध चित्रपटासह शेकडो चित्रपट रमेश देव यांनी केले आहेत.
देव यांचे गाजलेले चित्रपट
राम राम पाव्हणं, शारदा, पाटलाचं पोर, मानिनी, सप्तपदी, एक धागा सुखाचा, अवघाचि संसार, जगाच्या पाठीवर, पैशाचा पाऊस, बाप-बेटे, वरदक्षिणा, सोन्याची पावले, महाराणी येसुबाई, ये रे माझ्या मागल्या, कुलदैवत, पसंत आहे मुलगी, पायदळी पडलेली फुले, गाठ पडली ठकाठका, देवघर, चार दिवस सासूचे… चार दिवस सुनेचे, अन्नपूर्णा, मोलकरीण, शेवटचा मालुसरा, अपराध, आनंद, आहट, काळी बायको, मुजरीम, आंधळा मागतो एक डोळा, देवाघरचे लेणं, आई मला क्षमा कर, सात जन्माचे सोबती, प्रेम आंधळे असते, उमज पडेल तर, आरती, बाप माझा ब्रह्मचारी, भाग्यलक्ष्मी, चार दिवस सासूचे… चार दिवस सुनेचे, अन्नपूर्णा, मोलकरीण, शेवटचा मालुसरा, अपराध, आनंद, आहट, काळी बायको, मुजरीम, खिलौना, परदेश, पत्नी, चिंगारी, तिथे नांदते लक्ष्मी, कोशिश, जोरू का गुलाम, रामपूरका लक्ष्मण, ललकार, संजोग, बनफूल, मुनीमजी, कोरा कागज, या सुखानो या, प्रायश्चित्त, पारध, पतिता , कशासाठी … प्रेमासाठी अशा विविध चित्रपटांसह त्यांनी गेल्या काही चिमणी पाखरं, चल गंमत करू, तिन्ही सांजा, लग्नानंतरची गोष्ट, राजकारण, पिपाणी, जॉली एलएल.बी., वेल डन भाल्या, तात्याराव लहाने यासारख्या चित्रपटात गेल्या दोन दशकांत विविध चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या.