मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीची रंगता समजली जाणारी आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरची अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक ( Andheri East Election ) पार पडतेय. बऱ्याच राजकीय नाट्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके तर भाजपकडून मुरजी पटेल ( BJP Candidate Murji Patel ) निवडणूकीच्या मैदानात उतरलेत. मात्र आता मनसेेनं यात उडी घेेत भाजपनं आपला उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी करणारं पत्र उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांना लिहीलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
फडणवीसांना लिहीलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. या जागेवर रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार झाल्याने त्यांच्या आत्म्याला खरोखर शांती मिळेल, अशा आशयाचं पत्र लिहून राज ठाकरेंनी पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे.
दरम्यान आता याप्रकरणी फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे.