जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मधल्या काळात हीप बोनच्या शस्त्रक्रियेमुळे राज ठाकरे हे कोणाला भेटू शकले नव्हते. या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे (Raj Thackeray Speech) यांचं हे पहिलंच जाहिर भाषण होतं. शस्त्रक्रियेदरम्यानचा मिश्किल किस्सा सांगत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. आम्ही केलेलं एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं असं म्हणत जी लोकं मनसेच्या (MNS) आंदोलनावर टीका करतात त्यांना राज ठाकरेंनी चांगलाच फटकारलं. बहु सदस्यीय वार्ड पद्धती, त्याचबरोबर गोविंदांना दिलेलं आरक्षण या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला. (Reservation to Govinda in government jobs) येत्या काळातील निवडणुका निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या, अशा अनेक मुद्द्यांना हात घालत राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.
नक्की काय म्हणाले राज ठाकरे बघा, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
- मनसे आंदोलन अर्धवट सोडतो हा आरोप चुकीचा.
- शिवसेना भाजपाला कोणी प्रश्न विचारतं का टोलमुक्तीचा आश्वासन शिवसेना-भाजपचं.
- टोलबाबतच्या प्रश्नांना उत्तर दिली जात नाही, टोलचा पैसा कुठे जातो? हा मूळ प्रश्न.
- टोलचा पैसा सगळ्या पक्षांना जातो.
- मनसे आंदोलनानंतर मशिदीवरचे भोंगे बंद झाले.
- सध्याचे राजकीय वातावरण राज्यासाठी चांगलं नाही.
- कोण कोणासोबत आहे, हे कळतच नाही. ही तर सत्तेची आणि आर्थिक ॲडजस्टमेंट.
- माझं बंड नव्हतं, मी सांगून बाहेर पडलो.
- मी शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही.
- मी खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही.
- मी कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष उभा केला.
- मनसेमुळे मोबाईलमध्ये मराठी आली.
- भोंग्या विरोधातील आंदोलनाचा काही मुस्लिमांकडून स्वागत
- आमच्या एवढं महाराष्ट्रासाठी कुणीच केलं नाही, हे सांगा.
- मी नुपूर शर्मांची बाजू घेतली. झाकीर नाईकला वेगळा आणि नुपूर शर्मांना वेगळा न्याय का?
- ओवेसी हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलतात, सरकार त्यांना चाप का लावत नाही.
- 2019 ला लोकांनी मत युतीला दिली होती मात्र सरकार महाविकास आघाडीचं आलं.
- राज्यातील जनतेने जागं होण्याची गरज.
- उत्तरेकडचं राजकारण महाराष्ट्रात सुरू झालं.
- पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवा.
- स्लो पॉयझनिंग पसरवणाऱ्यांना छाटणे गरजेचे आहे.
- मी जे बोलतो ते कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचवलं पाहिजे.
- सोशल मीडियावर उणीधुनी काढायची नाहीत.
- निवडणुका कधीही लागतील, दिवाळीपूर्वी शक्यता कमी आहे.
- राजकारणासाठी थोर पुरुषांचा वापर केला जात आहे, महान पुरुषांना जातीमध्ये वाटलं जात आहे.
- नेत्यांच्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये उड्या सुरू आहेत.
- ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री ही युतीची अंडरस्टँडिंग मग शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मागितलच कसं?
- मोदींनी फडणवीस यांचे नाव घोषित केलं, तेव्हा आक्षेप का घेतला नाही?
- राजकारणात प्रत्येकाने आलं पाहिजे, राजकारण म्हणजे फक्त निवडणूक नाही.
अशा पद्धतीने विविध मुद्द्यांना हात घालत राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.