TOD Marathi

मुंबई : मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणावरून मनसे नेते राज ठाकरे यांनी आता आणखी एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. पुण्याच्या सभेत आपण काही दिवसात एक पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी पत्र प्रसिद्ध करत मनसैनिकांना हे पत्र घराघरात पोहचवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळेस केलं आहे.

पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मशिदीवरील भोंग्याच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकारण ढवळून निघालं आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा म्हणूनच माझे एक पत्र मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांत पर्यंत पोहोचविण्यात आलं.

हे पत्र त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचा आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही मला खात्री आहे

तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोचविण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही, असं आवाहनही त्यांनी पत्रातून केलं आहे.