टिओडी मराठी, दि. 22 जुलै 2021 – कोणत्याही बाबीची माहिती किंवा बातमी याची शहानिशा न करता हीच माहिती किंवा बातमी आपल्या प्रेक्षकांना/वाचकांना आदींना सांगितली किंवा प्रसारित केली गेली तर काय होतं?, हसू होतं, संबंधित व्यक्ती/संस्था आदींची बदनामी होते. असे प्रकार प्रसारमाध्यमात घडत असतात. अशीच आज एक बातमी काही प्रसारमाध्यमांनी दाखवली ती म्हणजे सध्या टेंडिंग विषय असलेल्या राज कुंद्रा पॉर्न फिल्मस प्रकरणाची. यात विनाकारण कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता अभिनेता उमेश कामतचा फोटो राज कुंद्रा पॉर्न फिल्मस प्रकरणातील संशयित आरोपी उमेश कामतच्या जागी वापरला. यात नाव सारखं आहे मात्र, व्यक्ती वेगळ्या, त्याचं करियर वेगळं आणि त्यांची चेहरेपट्टी अर्थात फोटो देखील वेगळे आहेत. याचा त्रास कलाकार उमेश कामातला सहन करावा लागतोय. याबाबत त्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे, उद्योगपती राज कुंद्रा पॉर्न फिल्मस प्रकरणामध्ये सध्या एक नाव गाजतंय ते म्हणजे उमेश कामत याचं. राज कुंद्राचा सहकारी म्हणून उमेश कामतला अटकही झाली आहे. आता या उमेश कामतचा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा कलाकार उमेश कामत याचा केवळ नाव साधर्म्याखेरीज काहीही संबंध नाही.
मात्र, काही माध्यमांनी याची शहानिशा न करता आरोपी उमेश कामत म्हणून कलाकार उमेश कामतचा फोटो वापरला. याचा कलाकार उमेशला विनाकारण प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावं लागलं. उमेशनं आपली नाराजी फेसबुकवेळ पोस्ट लिहून व्यक्त केली आहे. यात त्याने याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहे, असे म्हंटलं आहे.
सध्या उमेश कामत ‘अजून ही बरसात’ आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बुधवारी या मालिकेच शूटिंग करत असताना सेटवर उमेशला फोन व मेसेज आले. यानंतर उमेश अस्वस्थ झाला, तो म्हणाला, मला अनेकांचे मेसेज व फोन येऊ लागले.
माझ्यासाठी हे धक्कादायक होतं. मी कल्पना करू शकतं नाही, की कुणीही शहानिशा न करता असा बिनधास्त फोटो लावत आहे. मी कुणा कुणाला फोन करून स्पष्टीकरण देणार?. असं म्हणतं लोकांना खंर काय ते कळण्यासाठी आपण सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
तसेच या बातमीनंतर अनेक मराठी प्रेक्षक सपोर्ट करत आहेत, असं देखील उमेश म्हणाला. या प्रकरणानंतर उमेशला अमेरिका व दुबईमधून देखील फोन आले. या गोष्टीचा प्रचंड त्रास होत आहे.
माहित नाही, यामुळे मला किती आणि कुठपर्यंत नुकसान सहन करावं लागेल?. किती वेळ मला स्पष्टकरण द्यावं लागेल?. यासंबधी मी लिगल टीमशी बोलत आहे, असं म्हणत उमेशने कायदेशीर कारवाई करणार आहे, असं स्पष्ट केलं आहे .
कलाकार उमेश कामतने व्यक्त केली खंत :
प्रसारमाध्यमांनी चुकिचा फोटो वापरत बातम्या दिल्यानंतरही चूक न सुधारता कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केली नाही, याची खंत उमेशने व्यक्त केली. केवळ बातमी काढून काही उपयोग नाही.
जे पसरायचं आहे ते अगोदरच पसरलंय. वृत्तवाहिन्यांनी त्याच्या बातमी पत्रात चूक झाल्याचं मान्य करत ती चूक सुधारणं आवश्यक आहे. मात्र, अजूनही तसं काही झालेलं नाही, असं म्हणत उमेशने नाराजी व्यक्त केलीय.
बेजबाबदार पत्रकारिता@aajtak @CrimeTakBrand #NewsNation pic.twitter.com/qqSNWnDixk
— Umesh Kamat (@kamat_umesh) July 21, 2021