कुलरमध्ये गवत नव्हे ‘हे पॅड’ लावून घ्या AC सारखी थंड हवा; जाणून घ्या, पॅडची Price आणि फायदे

टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 जून 2021 – कुलरमधून थंड हवा मिळावी म्हणून गवताचा वापर करतात. आता त्या गवताचा काळ संपला आहे. त्याऐवजी कुलरमध्ये खास प्रकारचा कागद वापरला जात आहे. हा कागद म्हणजे विशेष प्रकारचे पॅड आहे. ते कागदापासून बनवले जाते. त्याची रचना मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे असते. म्हणूनच त्याला हनीकॉम्ब पॅड असं म्हणतात. त्याचा उपयोग कुलरचं पाणी थंड होण्यासाठी केला जातो.

हे कागदी हनीकॉम्ब पॅड वेगवेगळ्या जाडीमध्ये मिळते. जितकं हे पॅड जाड तितकी थंड हवा कुलरमधून मिळणार. हा कागद गवताप्रमाणे काम करतोय. पाण्याच्या पंपामुळे हा कागद ओला होतो, त्यानंतर पंप सुरु झाला की तो हवा थंड करतो.

यामागील तंत्र बाष्पीभवनाचे आहे. हे हनीकॉम्ब पॅड कुलरला लावले की अनेक वर्षे विना अडचण थंड हवा मिळत राहील.

हे हनीकॉम्ब पॅड चांगलं :
उत्तम गुणवत्तेचं जाड हनीकॉम्ब पॅड कुलरमध्ये टाकलं तर ते गवतापेक्षा अधिक काळ टिकतं. गवतापेक्षा अधिक काळ ते थंड हवा देखील देतं.

बाजारामध्ये अनेक प्रकारचे हनीकॉम्ब पॅड उपलब्ध आहेत. त्यामुळे गुणवत्तेशी तडजोड न करता पॅड घ्यावे. हे हनीकॉम्ब 5 वर्षांपर्यंत टिकतं.

जाणून घ्या, हनीकॉम्ब पॅडची किंमत :
गवताच्या तुलनेत हनीकॉम्ब पॅडची किंमत अधिक आहे. चांगल्या गुणवत्तेचं हनीकॉम्ब पॅड घेतलं तर त्याची किंमत 1000 रुपयांपर्यंत आहे. त्या तुलनेत गवताची (वुडवुल पॅड) किंमत केवळ 150-200 रुपये इतकी असते.

Please follow and like us: