टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 3 जुलै 2021 – उत्तराखंड विधीमंडळ पक्षनेते पदी पुषकरसिंह धामी यांची शनिवारी निवड केल्यामुळे ते आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील हे स्पष्ट झाले. उधमसिंगनगर जिल्ह्यातील खतिमा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले खामी तिर्थसिंह रावत यांची जागा घेणार आहेत. राज्य विधानसभेत त्यांच्या निवडूवरून वैधानिक वाद निर्माण झाल्याने त्यांनी शुक्रवारी रात्री राजीनामा दिला होता.
धामी यांनी खतिमा मतदारसंघातून पहिल्यांदा 2012 मध्ये आणि पुन्हा 2017 मध्ये विजय मिळवला होता. ते सध्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनांत ते 33 वर्ष कार्यरत आहेत.
त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून उत्तर प्रदेशातील अवध प्रांतात काम केलं आहे. 2002 ते 2008 या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तराखंडचे अध्यक्ष म्हणून होते.
महाराष्ट्राचे राज्यपाल असणाऱ्या आणि तत्कालीन उत्तराखंडचे मुख्यमंत्री असणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांचे 2001-02 या काळात ते विशेष कार्यअधिकारी म्हणून काम पहात होते. नागरिक देखरेख समितीचेही ते उपाध्यक्ष म्हणून होते.
धामी हे तरूण तसेच क्रियाशील नेते आहेत. मात्र, अल्पावधीत पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. धामी हे ठाकूर समजातील व पर्वतीय क्षेत्रातील आहेत. त्यांची निवड करून पक्षाने जातीय आणि प्रादेशिक समतोल पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साधला आहे, असे समजते.
उत्तराखंडमध्ये कुमान विरूध्द गढवाल, ठाकूर विरूध्द ब्राह्मण, आणि पर्वतीय विरूध्द पठार अशा पध्दतीने मतांचे विभाजन होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक हे हरिद्वार या पठारावरील प्रदेशातील ब्राह्मण समाजातील आहेत.
तर, पायउतार झालेले तिर्थसिंह रावल हे ठाकूर समाजातील होते. मात्र, ते गढवाल या पाठारी प्रदेशातील होते.