TOD Marathi

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडकासाठी (Purushottam Karandak) यावर्षी एकाही महाविद्यालयाचा संघ पात्र ठरला नाही. सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन या विभागातही कोणी पात्र नसल्याने ही पारितोषिकं परिक्षकांनी जाहीर केली नाहीत. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीसही कोणालाही जाहीर केलेले नाही.पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा दर्जा कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आयोजकांनी हा धक्कादायक निर्णय घेतला आहे. नाटक क्षेत्रातील विविध कलाकारांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे, मुंबई, विदर्भ, मराठवाडासह (Including Pune, Mumbai, Vidarbha, Marathwada) या स्पर्धेसाठी राज्यभरातून एकांकिका घेऊन स्पर्धक सहभागी होत असतात. पण परिक्षकांच्या या निर्णयाने अनेक स्पर्धकांचा स्पर्धेबद्दल उत्साह कमी झाला आहे. दरम्यान पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) (Insititute Of Computer Technology) (PICT)

यांची ‘कलिगमन’ (Kaligaman) ही एकांकिका करंडकासाठी पात्र नसली तरी या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या संघास पुरुषोत्तम करंडक मिळणार नाही पण त्यांना पाच हजार एक रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.

अशाच पद्धतीने दुसरे पारितोषिक बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या ‘भू भू’ या एकांकिकेस मिळाले आहे. त्यांना द्वितीय क्रमांकाची हरी विनायक करंडक जाहीर झाला. तर तिसऱ्या क्रमांकाचा संजीव करंडक शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, शास्त्र आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाच्या ‘गाभारा’ एकांकिकेस जाहीर झाला आहे.

त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकं देऊनही यावेळी कोणाला गौरवण्यात आलेले नाही. वैयक्तिक अभिनय नैपुण्यासाठी दिला जाणारा नटवर्य केशवराव दाते करंडक, वाचिक अभिनयासाठी देण्यात येणारा पुरुषोत्तम जोशी करंडक, यशवंत स्वराभिनय करंडक आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला मिळणारा नटश्रेष्ठ गणपतराव बोडस करंडक इ. या पुरस्कारांचाही कोणीही मानकरी यावर्षी ठरला नाही. दरम्यान असे असले तरीही या बक्षीसांसाठी सनी पवार, तन्वी कांबळे आणि प्रतीक्षा शेलार या विद्यार्थ्यांची निवड झाली. करंडक न देता त्यांना रोख बक्षीस दिले जाईल. यावर्षीच्या अशा निर्णयामुळे सर्वांनाच कोड्यात टाकले आहे.कारण या पुरस्कारांच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय या स्पर्धेत आढळून आलेला नाही.

रविवारी रात्री या स्पर्धेच्या निकालाची घोषणा करण्यात आली असून बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी २३ सप्टेंबर रोज होणार आहे. निकालाची घोषणा करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अंतिम फेरीसाठी हिमांशू स्मार्त, पौर्णिमा मनोहर, परेश मोकाशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांच्या हस्ते भरत नाट्य मंदिर याठिकाणीच पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज