बॉलीवूडचा दमदार अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) नेहमीच त्याच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या समस्यांशी लढताना दिसतो. आता पर्यंत त्यानें अश्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे जे लोकांना आवडले आणि त्या विषयांवर समाजात जागृती झाली. आता पुन्हा एकदा आयुष्मान प्रेक्षकांच्या भेटीला असाच एक चित्रपट घेऊन येत आहे, जो त्यांना प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडेल त्याचं बरोबर एक सामाजिक संदेश ही देणार. यावेळी आयुष्मान स्त्रीरोगतज्ज्ञाच्या भूमिकेत दिसत आहे. ‘डॉक्टर जी’ (Doctor G)या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरत नाही, हेही निश्चित.
आयुष्मान खुरानाच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘डॉक्टर जी’ असं असून तो या चित्रपटात एका स्त्रीरोग तज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मानने ”आयुष्याने उत्तम गुगली दिली आहे. ऑर्थोपेडिक व्हायचे होते,पण झालोय ‘डॉक्टर जी’ असं म्हणत चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक कॉमेडी ड्रामा आहे, त्यामुळे तो तुम्हाला हसवेल, भावूक करेल आणि प्रेक्षकांना मजा येईल.
आयुष्मान सतत हटक्या आणि महत्वाच्या विषयांवर चित्रपट घेऊन येत असतो. पदार्पणातच त्याने ‘विकी डोनर’ या महत्वाच्या विषयावर भाष्य करत प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. त्यानंतर त्याने ‘अंधाधून’, ‘दम लगाके हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आर्टिकल १५’ (‘Andhadhun’, ‘Dum Lagake Haisha’, ‘Bareilly Ki Barfi’, ‘Dream Girl’, ‘Article 15′) अशा वेगवेगळ्या चित्रपटातून आयुष्मानने स्वतःला एक उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केलं आहे. आता पुन्हा आयुष्मान असाच एक वेगळा चित्रपट घेऊन येत आहे. नुकतंच त्याने याविषयी सोशल मीडियावर नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.’डॉक्टर जी’ ही एका पुरुष स्त्रीरोग तज्ज्ञाची जीवनकहाणी असणार आहे. आयुष्मानचे चाहते आणि सगळेच चित्रपटप्रेमी या नवीन चित्रपटासाठी उत्सुक आहेत. नेहमीप्रमाणेच आयुष्मान काहीतरी वेगळं कथानक मांडेल, महत्वाच्या सामाजिक विषयावर भाष्य करेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे.