TOD Marathi

निर्माते महेश रेड्डी यांची आगामी प्रोजेक्टची घोषणा

संबंधित बातम्या

No Post Found

काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन माध्यमातून सोशल मीडियावर एम वाय रेड्डी प्रोडक्शनचा लोगो रिलीज करण्यात आला होता. (Logo of M Y Reddy Production launched recently) आणि त्यानंतर एम वाय रेड्डी प्रोडक्शनच्या नव्या प्रोजेक्टची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. महेश रेड्डी (Mahesh Reddy) यांनी नुकताच एक कलाकारांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये बिग बॉस फेम अभिनेता अक्षय वाघमारे (Actor Akshay Waghmare), कारभारी लयभारी या मालिकेतील नायिका अनुष्का सरकटे, तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अभिनेते मिलिंद दास्ताने (Actor Milind Dastane), देवमाणूस मालिकेतील अभिनेत्री अंजली जोगळेकर (Anjali Joglekar) हे कलाकार दिसत आहेत.

हा प्रोजेक्ट सिनेमा आहे, मालिका आहे किंवा वेब सिरीज आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी लवकरच प्रेक्षकांना नवीन काही तरी बघायला मिळेल असं म्हणत प्रेक्षकांची आणि चाहत्यांची उत्कंठा मात्र वाढवली आहे.

महेश रेड्डी हे ईट्स माय डिझाईन ग्रुप ऑफ कंपनीज़चे (Its my design group of companies) डिरेक्टर असून आय टी, पी आर, ब्रॅण्डिंग, ऍडव्हर्टायझिंग या क्षेत्रात गेली सात वर्षे कार्यरत आहेत. दरम्यान त्यांनी शिक्षण, आरोग्य, खाद्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही काम केलं आहे. नुकतच त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे. इट्स माय डिझाईन ग्रुप ऑफ कंपनीच्या पुण्यासह दिल्लीतही शाखा आहेत.